“खड्ड्यांचं पुणं झालंय, त्यांना खड्डापुरुष पुरस्कार द्या”; उद्धव ठाकरे गडकरींवर बरसले

Uddhav Thackeray | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (3 ऑगस्ट) पुण्यात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले, यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुण्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर भाष्य करत त्यांनी  (Uddhav Thackeray)गडकरी यांना खडेबोल सुनावले.

उद्धव ठाकरेंनी मुंबईतील विधानाचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. “आमचे नितीन गडकरी छातीठोकपणे सांगत होते की, मी असे रस्ते बनवेण की 200 वर्षे खड्डेच पडणार नाहीत. पण, आता खड्ड्यांचं पुणं झालंय. मुंबईतही खड्डेच खड्डे झाले आहेत.”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींवर टीका

तसंच अजूनही कोकणातील मुंबई-गोवा महामार्ग होत नाहीये. जसं युगपुरुष असतं तसं खड्डापुरुष असा पुरस्कार द्या सगळ्यांना. टरबूज जाऊ द्या ओ, कुठंही खड्ड्यात घाला त्याला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर हल्लाबोल केला.

“ज्या कंत्राटदाराने संसद भवन बांधलं. तोच गुजरातचा कंत्राटदार पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प करतोय. नव्या संसद भवनालाही गळती लागलीय, राम मंदिराला गळती लागली होती. यांचं सगळंच गळतंय.”, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला लगावला आहे.

वाघनखं अन् मुनगंटीवार कुठं जुळतंय का?

पुढे त्यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर देखील निशाणा साधला. “मुनगंटीवार म्हणतात की शिवाजी महाराजांची वाघनखे आणली. त्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता की नाही माहीत नाही. पण, त्या वाघनखांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा होता. ही वाघनखे मुनगंटीवारांनी आणली आहेत. वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतंय का?”,अशी खिल्ली ठाकरे यांनी उडवली.

तसंच उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री यांना थेट अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज म्हटलं. “इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा हुशार होता, असं म्हणावं लागेल.त्याची तीन बोटं कापली गेल्यानंतर तो पुन्हा महाराष्ट्रात आला नाही. त्यातील काही हुशारपण यांनी घेतलं असतं तर परत महाराष्ट्रात आले नसते.”, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अप्रत्यक्षपणे अमित शाह यांच्यावर टीका केली.

News Title – Uddhav Thackeray slam Nitin Gadkari

महत्त्वाच्या बातम्या-

“अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज”

‘मी ढेकणांच्या नादी लागत नाही’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

EPFO मधील कोट्यवधी खातेधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; आता PF…

“अमिताभ यांनी ऐश्वर्याला कधीच सून मानले नाही”; जया बच्चन यांचा मोठा खुलासा

दिपीकाने दिला बाळाला जन्म?; सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल