“दुसऱ्याचं घर फोडून स्वत:चं घर सजवणाऱ्या अवलादींना गाडून…”

मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत (Vanchit Bahujan Aghadi) युतीची जाहीर घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे.

आमची युती ही विजयी दिसणार आहे. आमची युती नव्हती तेव्हाही मी सांगितलं होतं की निवडणुका घेऊन दाखवला. आजही माझं गद्दारांना आणि त्यांच्या राजकीय बापांना हेच सांगणं आहे की लवकरात लवकर निवडणुका घ्या, असं आव्हान ठाकरेंनी दिलंय.

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान असणार आहे. कुणाच्या कुठल्या जागा? हे आमचं ठरायचं आहे. मात्र आमच्यात सामंज्यस आहे आम्ही त्या प्रमाणे योग्य निर्णय घेऊ. तसंच वंचित बहुजन आघाडी आमच्यासोबत आली आहे तर ती महाविकास आघाडीचाच भाग असणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशात ठाकरे आणि आंबेडकर या नावाला इतिसाह आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळात वाईट प्रथांवर आघात केला. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरु आहे. त्यामुळे आम्ही आज एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, आम्हाला गृहित धरून अडीच-तीन वर्षे राजकारण केलं गेलं. शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही. शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. मला हे पण सांगितलं होतं की शरद पवार कसे फसवतात हा लौकिक तुम्हाला ठाऊक आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More