बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाव न घेता उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना झापलं!

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांनी मास्क न घालण्यावरुन सुनावलं आहे. मास्क न घालणं हा काही शूरपणा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अनेक जणांना वाटतं की मास्क का लावतोय तू? मास्क न लावण्यात काय शौर्य आहे? मी मास्क वापरत नाही, मी मास्क वापरणार नाही… काय शूर आहेस? मास्क न वापरणं या शूरता नाही. मास्क लावायला लाजण्याची गरज नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे हे गेले अनेक दिवस मास्क न घालताच सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याचं पाहायला मिळतंय. अखेर आता मुख्यमंत्र्यांनी याच मुद्द्यावरुन त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाही झापलं आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

राज्यात लॉकडाऊन लावला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा विरोधकांकडून दिला जात आहे. मी म्हणतो आता रस्त्यावर उतराच. आता सगळ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पण रस्त्यावर उतरायचं ते आंदोलन, मोर्चांसाठी नाही. तर लोकांच्या सेवेसाठी. ज्या घरात सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्या मदतीसाठी, जे आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी जे जिवाची पर्वा न करता आपलं कर्तव्य बजावत आहेत, अशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांना केलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत’; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; जाणुन घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!

निवडणूका आहेत तिकडे कोरोना नाही का?, उद्धव ठाकरे म्हणाले…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More