Top News महाराष्ट्र मुंबई

“हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा”

Photo Credit- Facebook/ Uddhav Thackeray & Amit Shaha

मुंबई | नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असं म्हणता. हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा, मग आम्ही तुमचं स्वागत करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि काही आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण ते पैसे मागण्यासाठी पोहोचत आहेत. आपल्याला तसं करायचं नाहीये. देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती, आता भाजप पैसे गोळ्या करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”

भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे

लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….

या लोकांना महिलांवर अत्याचार करायला सरकारने लायसन्स दिलंय काय?- नारायण राणे

“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत बसतील”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या