बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी खंजीरची भाषा करु नये’, मुख्यमंत्र्यांचा घणाघात

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्याला पंधरवडा उलटून गेला तरी अद्याप त्यांचा मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. त्याचाच धागा धरत शिवसेनेचे नेते आणि सर्व भाजप विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांनी दोनदा मंत्रीमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे केले तरी अद्याप खाते वाटप झाले नाही.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (दि. 24) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांवर टीका केली. ते बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या वडिलांचा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावू नका. सुदैवाने तुमचे आईवडिल जीवंत आहेत. त्यांचे फोटो लावा आणि निवडणूका लढवून मते मागा. त्यांना सोबत घेऊन सभा घ्याव्यात, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली.

तर यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवसैनिक आहोत. त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. आम्हाला राज्यभरातून शिवसैनिकांचे समर्थन मिळत आहे. बाळासाहेब हे आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशिर्वादाने हे सरकार स्थापन झाले आहे. वास्तविक हे अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होते.

दरम्यान सतत पाठीत खंजीर खुपसल्याची भाषा केली जाते. मी त्यावर असे बोलेन की, जे स्वत: राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (INCINC) जंजीरमध्ये अडकले आहेत, त्यांनी खंजीराची भाषा करु नये. पाठीत खंजीर कोणी खुपसला? हे मी योग्य वेळ आल्यावर नक्की सांगेन, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

थोडक्यात बातम्या –

सकाळी उठल्यानंतर तुम्हालाही ‘या’ गोष्टींची सवय असेल तर सावधान! आरोग्यावर होतील विपरित परिणाम

‘घर नसल्यामुळे पार्कमध्ये झोपायचे’, उर्फीने सांगितली तिच्या संघर्षाची कथा

रणवीरचा ट्रेंड साऊथमध्येही, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानेही केलं न्यूड फोटोशूट

जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा निर्णय, मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, ‘या’ कालावधीत होणार परिक्षा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More