माझी थट्टा करा पण… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘हे’ कळकळीचं आवाहन
मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेक मुद्यांवरून हमरी तुमरी पाहायला मिळत आहे. भाजपमधील नेते सत्ताधाऱ्यांना कोपरखळ्या लगावत आहेत. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चेदरम्यान विरोधकांनी मी जबाबदार मोहिमेवरुन सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना आवाहन केलं आहे.
मी जबाबदार ही मोहीम हे उघड ते उघडा त्यांच्यासाठी आहे. मला वाईट म्हटलं तरी चालेल मी वाईटपणा घेईन. माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका. पण एका वर्गासाठी समाज धोक्यात घातला तर तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कोरोना विषाणू सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ओळखत नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा येईनवरून टोला लगावला.
मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…कोरोना हा विषाणू आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यासोबतच माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत महसूल, आरोग्याचे कर्मचारी राज्यात घरोघर गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. सरकार खबरदारी घेत आहे. देशात जगात पहिले जम्बो हॉस्पिटल आपण उभे केलं. किती जणांना उपचार दिले ही माहिती ही आपल्याकडं असल्याचं ठाकरेंनी सांंगितलं.
दरम्यान, राज्यात कोरोना आला होेता तेव्हा मुख्यमंत्र्यांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम राबवली होती. त्यानंतर आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने नागरिकांना मी जबाबदार ही मोहीम राबवण्यास सांगितली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी आपण स्वत: काळजी घेतली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! बलात्काराच्या आरोपात 20 वर्षांची शिक्षा भोगली, आता सुटला निर्दोष…
पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘या’ बड्या गुंडाला घरात घुसून ठोकल्या बेड्या
एका षटकात ‘या’ खेळाडूने ठोकल्या 28 धावा, चक्क! स्टेडियममधील खुर्चीचं तोडली – पाहा व्हिडीओ
बिकनी शूटसाठी अभिनेत्री 2 दिवस उपाशी ‘हे’ आहे कारण
कोरोना व्हायरस म्हणतोय ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – उद्धव ठाकरे
Comments are closed.