“मुंबईचा विचार फक्त सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला”
मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पावर विधिमंडळात चर्चा चालू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीवरून राज्यात गोंधळ झाला होता. परिणामी आता उद्धव ठाकरेंनी सभागृहात विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
मुंबईचा एवढ्या गांभिर्यानं माझ्या मंत्रिमंडळानं विचार इतर कोणी केला नव्हता. मुंबईचा विचार फक्त सोन्याची अंडे देणारी कोंबडी म्हणून केला गेला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. धारावीच्या विकासाची योजना आमच्या विचारात आहे. केंद्रासोबत आमचं बोलणं सुरू आहे, असं ठाकरे म्हणाले आहेत.
आघाडी सरकार काम करून दाखवते, आम्ही दिलेला शब्द पाळतो, फक्त घोषणा करत नाहीत, अशी खरमरीत टीका ठाकरेंनी विरोधकांवर केली आहे. सफाई कामगारांचा विचार आम्ही केला आहे. कष्टकऱ्यांना आणि ग्रामीण लोकांना आम्ही घरे देणार आहोत, असं ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपकडून करण्यात येणाऱ्या टीकेचा ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. ठाकरेंनी केंद्र सरकारच्या सहकार्यानं धारावीच्या विकासाची संकल्पना मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“दोन हात करायची वेळ आली तर शिवसैनिक कमी पडणार नाही”
मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीनं घेतला ‘हा धक्कादायक निर्णय
‘मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले’; आठवलेंनी दिली संसदेत माहिती
टाटाच्या ‘या’ शेअरची कमाल; गुंतवणूकदार मालामाल
“पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एका चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय”
Comments are closed.