मुंबई | बऱ्याच वेळा काँग्रेस डावपेच करायचे आणि आम्ही शोध लावायचो त्यावेळी कळायचे की यामागे अहमदभाई आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
अहमद पटेल यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीनं करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. अहमद पटेल यांच्या सारखी काम करणारी माणसं शोधून सापडणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अहमद पटेलांविषयी माझ्याकडे असे काही किस्से नाहीत. मात्र, त्यांची कारकीर्द ही अहमदभाई काँग्रेस नेते म्हणून आणि मी सेना नेता म्हणून अशी राहिली, आम्ही विरोधात होतो. काँग्रेस आणि सेना एकत्र येते, राजकीय नाते पुढे जाते आणि अचानक राजकीय आघात होतो, हे दुःखदायक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
महाविकास आघाडी बनवताना अहमद पटेल यांनी चिंता करु नका म्हणून सांगितलं. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. अहमद पटेल अनेकदा सरकार कसं चाललंय, ही विचारणा करण्यासाठी फोन करायचे. महाविकास आघाडीच्या निर्मितीमध्ये अहमद पटेल यांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या जाण्यानं महाविकास आघाडीचं मोठ नुकसान झालंय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचं उत्तर, म्हणाला…
…म्हणून मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस
“पाकिस्तानी क्रेडिट कार्ड बाळगणाऱ्यांनी तानाजी मालुसरे यांच्याशी तुलना करू नये”
“…तर बाळासाहेब ठाकरेंनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता”
“एकाही मावळ्याचं नाव घ्यायच्या लायकीचे नाहीत सरनाईकसारखी माणसं”