मुंबई | एल्गार परिषदेच्या तपासाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. एल्गार परिषदेचा तपास मी एनआयएकडे दिला नाही तर तो केंद्राने अविश्वास दाखवत आमच्याकडून घेतला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
केंद्राने राज्य सरकारच्या तपासावर अविश्वास दाखवल्याबद्दल आमची नाराजी आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
एल्गार प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटीच्या माध्यामातून करावा, अशी आग्रही भूमिका शरद पवारांनी या आधीच केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी हा तपास राष्ट्रीय तपास आयोगाद्वारे करण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली. त्यांच्या या निर्णयावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, एल्गार परिषदेचा तपास मी एनआयएकडे दिला नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
लेकीच्या बुरखा घालण्यावरून टीका करणाऱ्यांना ए. आर. रेहमानचं जोरदार उत्तर
कलमांतर्गत नियुक्त्या देता येतील पण सरकार का घाबरतंय??- फडणवीस
महत्वाच्या बातम्या-
भाजपने आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे बघावं- उद्धव ठाकरे
कर्जमाफाची पहिली यादी उद्या जाहीर करणार- मुख्यमंत्री
सरकार काम करतंय हे विरोधकांना पचत नाही- उद्धव ठाकरे
Comments are closed.