बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मविआचे चारही उमेदवार निवडून आणा, निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू”

मुंबई | महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक ट्रायडंटवर पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांना संबोधित केलं. यावेळी बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपले चारही उमेदवार विजयी होतील. राज्यसभेपाठोपाठ होणारी विधानपरिषदेची निवडणूकही आपण जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना संबोधित करताना बोलून दाखवला.

मतदानापूर्वी एकत्र राहा. मविआचे चारही उमेदवार निवडून आणा, असं ठाकरे मुख्यमंत्री आमदारांना म्हणाले. राज्यसभा, विधानपरिषदेची निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

राज्यसभा, विधानपरिषदेची निवडणूक झाल्यावर आपण पुन्हा भेटू आणि पार्टी करू, असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

रेल्वेने भंगार विकून केली ‘इतक्या’ कोटींची कमाई!

‘…म्हणून आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे’; संजय राऊतांनी सांगितलं कारण

Monsoon Update | मान्सून संदर्भात मोठी अपडेट समोर

‘चिरीट तोमय्या आमदार शिवसेनेला मतदान करतील, पण…’; दिपाली सय्यद यांनी सोमय्यांना डिवचलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More