बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता- उद्धव ठाकरे

कोल्हापूर | संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो. गर्दी करून ताकद दाखवता येते. मात्र, त्यामुळे कोरोनाची साथ पसरण्याचा धोका आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनावर टीका केली आहे.

संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरु केलात. अनेकजण आदळाआपट करत आहेत. पण त्याविषयी मी तुर्तास फार बोलणार नाही, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांचे कान टोचले. कोल्हापुरातील सारथी उपकेंद्राच्या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यात बोलत होते.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणारा आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संयम बाळगल्याबद्दल संभाजीराजे छत्रपती यांचे आभार. न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरणं हा भाग आहे. पण संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं तोच नेता होऊ शकतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

आम्हाला तुम्हाला सोडायचं नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका- जयंत पाटील

“आम्हाला अटक केली तरी आमचा हा लढा सुरूच राहील”

चुकून तुम्ही सत्तेत आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही- पंकजा मुंडे

“भाजपचं ओबीसी आरक्षणासाठीचं आंदोलन म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना”

ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या प्रविण दरेकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More