बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं- उद्धव ठाकरे

मुंबई | कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासन स्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पण राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या महाराष्ट्रातील 344 रक्तपेढ्यांमध्ये 19 हजार 59 रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या 2 हजार 583 युनिट आणि मुंबईतील 58 रक्तपेढ्यांमध्ये 3 हजार 239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.

महत्वाच्या बातम्या-

Shree

अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल, अर्णव गोस्वामींसह 2 जणांविरोधात गंभीर आरोप

“यापुढे राज्यातील भाजप नेत्यांनी झेपेल तितकंच बोलावं”

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!

प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली इतक्या दिवसांची मुदत

गाडी घेताना एक रुपयाही भरण्याची गरज नाही; या कंपनीनं आणलीय भन्नाट ऑफर!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More