मुंबई | राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे होते.
महाराष्ट्राला एक इतिहास आहे. महाराष्ट्र एक सर्वार्थाने वेगळे राज्य आहे. इथे वेगळे संस्कार आहेत. त्यामुळे येथे येऊन कुणी काही घेऊन जाऊ शकत नाही. स्पर्धेला आम्ही घाबरत नाही. पण कुणी ओढून ताणून येथून काही घेऊन जाणार असेल, तर शक्य होणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक येत आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्रातील या बदलाचे 113 वर्षे जुने साक्षीदार आहे. त्यामुळेच तुम्हीच महाराष्ट्राचे ब्रॅंड अम्बॅसिडर आहात. महाराष्ट्राच्या यशाची गाथा, गोष्टी तुम्हीच इतरांना सांगू शकता. कुठलीही अडचण असेल, तर ती दूर करण्यात सरकार तुमच्यासोबत असतं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर
“कोरोना काळात उद्धवजींनी महाराष्ट्र सांभाळला, महाविकास आघाडीचं काम वाखणण्याजोगं”
हो…काँग्रेसची विधानपरिषदेची ऑफर मी नाकारली; उर्मिला मातोंडकर यांचा खुलासा
“पदाची अपेक्षा नाही; लोकांसाठी काम करायचंय म्हणून शिवसेनेत आले”
विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता