महाराष्ट्राची जबाबदारी माझ्यावर आहे, तुम्ही मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे
मुंबई | राज्यात निवडणुका असो किंवा काय तिकडे कोरोना नाही असं विचारलं जातं, पण मला त्या राज्यांचं पडलेलं नाही, मला महाराष्ट्र प्यारा आहे. आम्ही सत्यच सांगत राहू, मग मला व्हिलन ठरवलं तरी चालेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
काहीही लपवत नाही आणि लपवणार नाही. महाराष्ट्रातील परिस्थितीत धक्कादायक जरी वाटत असली तरी जे सत्य आहे ते सांगत आहोत. इतर राज्यात वाढ नाही तुमच्याकडे का? या प्रश्नावर उत्तर देणार नाही. मला महाराष्ट्र प्यारा आहे. त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे कुणी व्हिलन ठरवलं तरी माझी जबाबदारी पार पाडेल. पाडणारच ते माझं कर्तव्य. त्यामुळे घाबरु नका, असं मुख्यमंत्री म्हणाले.
आरोग्य सुविधा सुधारणं म्हणजे फर्निचर उभं करणं नाही, तज्त्ज्ञ डॉक्टर हवेत. लॉकडाऊन लावल्यावर रस्त्यावर उतरु जे म्हणतात, त्यांनी जरुर रस्त्यावर उतरावं, त्यांनी मदतीसाठी रस्त्यावर उतरावं, आपल्याला ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी लाॉकडाउनचे संकेत दिले आहेत. तसेच मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
निवडणूका आहेत तिकडे कोरोना नाही का?, उद्धव ठाकरे म्हणाले…
तुम्हाला विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका- उद्धव ठाकरे
लाॅकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरू म्हणणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंनी झापलं, म्हणाले…
‘आज लॉकडाऊन जाहीर करत नाही, पण…’; उद्धव ठाकरेंचा जनतेला पुन्हा इशारा
मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेची संवाद ; वाचा संवादातील मुद्दे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.