बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“BMC ने रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर द्यावेत, बेड मिळण्यात अडचण येऊ देऊ नका”

मुंबई | रुग्णालयातील व्यवस्थापन आणि ऑक्सिजन पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्या. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थितीच्या ऑनलाईन आढावा बैठकीत बोलत होते

लवकर कोरोनाचं निदान झाल्यास वाढत्या प्रसाराला आळा घालता येईल. त्यासाठी मुंबईतील सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांकडून रुग्णांचे चाचणी अहवाल कमी वेळेत उपलब्ध होण्यासाठी आवश्यक नियोजन करावं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

बाधित रुग्णांना रुग्णशय्या मिळण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेबरोबरच अतिरिक्त रुग्णशय्यांच्या उपलब्धतेवर भर द्यावा. त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी उत्पादक अथवा पुरवठादारांशी समन्वय साधावा. या माध्यमातून रुग्णांना आवश्यक सुविधा देऊन हे संकट दूर सारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असंही उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले.

दरम्यान, रेमडेसीवीर इंजेक्शनसह इतर औषधांची कमतरता भासणार नाही याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या 2 लाख मात्रा खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील 25 हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. अधिक पुरवठा लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत, असं इकबाल चहल यांनी यावेळी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

सावधान! कोरोना हवेतून पसरतोय; परिस्थिती आणखी गंभीर होणार

उस्मानाबादेत एकाच वेळी 23 जणांवर अंत्यसंस्कार; हृदय पिळवटून टाकणारी दृश्य

भारतासाठी धोक्याचा इशारा, दररोज होऊ शकतो 2320 जणांचा मृत्यू

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; महाराष्ट्र सरकार करणार मेगाभरती

कोरोनामुळे घरीच मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं; महाराष्ट्रातील ‘या’ तीन शहरांमध्ये सर्वाधिक घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More