बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…- उद्धव ठाकरे

मुंबई | शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच, पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती. आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणं आपली जबाबदारी आहे, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे सांगितलं. हे याचसाठी सांगितलं कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

थोडक्यात बातम्या-

कल्याणमध्ये राडा; काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवसेनेच्या महिला आघाडीनं दिला चोप, पाहा व्हिडिओ

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडांची हातात तलवार घेऊन दहशत, पाहा व्हिडिओ

‘संजय राठोड हे ठाकरे सरकारमधील गजा मारणे’; ‘या’ भाजप नेत्याची गंभीर टीका

“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”

धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More