बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं.

राज्यासाठी गरजेचं असेल तर मी कुणाचंही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या. आता सहाशेच्या आसपास प्रयोग शाळा आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आपल्या उच्च न्यायालयाने सरकारला विचारलं आहे. की यापेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का. मात्र मला वाटतं तशी गरज येणार नाही. रुग्णवाढ कमी झाली असं नाही, पण ज्या वेगाने वाढत होती ती आता स्थिरावली आहे. बंधनं लावणं सोपं आहे, पण पाळणं अवघड आहे. मी गेल्यावेळी म्हटलं होतं, आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

आपण संयम दाखवला आणि मी काही निर्बंध लादले. त्या दिवशी मलाही सांगायला जड गेलं होतं. पण त्याची गरज होती. तुम्हीही माझं नेहमी प्रमाणे ऐकलं. जी रुग्णवाढ साडेनऊ लाखांपर्यंत जाऊ शकली असती ती आपण साडेचार पाच लाखांपर्यंत रोखली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच

थोडक्यात बातम्या- 

महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांचे निधन, नुकतेच कुंभमेळ्यावरुन परतले होते

“रोहित सरदाना खोटारडा होता, तो कुणाच्याही लक्षात राहणार नाही”

#सकारात्मक_बातमी | श्रीगोंद्यातील दोघा आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

“भारतासोबत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये”, बिल गेट्स यांचं धक्कदायक वक्तव्य

इंदोरीकर महाराजांनी सांगितला कोरोनातून वाचण्याचा ‘हा’ खास उपाय

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More