Top News महाराष्ट्र मुंबई

‘पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, कोरोना नाही’; मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांना खडसावलं

Photo Credit- Uddhav Thackeray Twitter

मुंबई | लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोना नियम पाळले जात नसल्यानं कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याला सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकारणीदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजकारण्यांना तंबी दिली आहे.

पक्ष वाढवा, कोरोना नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना खडसावलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

पक्ष सर्वांनाच वाढवायचा आहे, पण कोरोना नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनीही नियम पाळावेत. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन काही दिवस टाळा. लवकरच शासकीय कार्यक्रम झूमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसेच लॉकडाऊन लागणार की नाही हे तुमच्या हातात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी 8 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

लोक आता मास्क घालत नाहीत. पहिली सॅनिटायझरची बाटली प्रत्येकाकडे असायची आता नाही. त्यामुळे आता आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी राबवली आता मी जबाबदार ही मोहीम राबवायची आहे. मी जबाबदार म्हणजे मी मास्क घालणार, हात धुणार, सॅनिटाझर वापरणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते मास्कशिवाय फिरतील आणि ज्यांना तो नको आहे ते मास्क घालून फिरतील, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

तृणमूल काँग्रेसला धक्का! कोळसा चोरी प्रकरणी सीबीआयने केली ‘ही’ मोठी कारवाई

धक्कादायक! पुण्यात Tiktok स्टार समीर गायकवाडने केली आत्महत्या

“भाजपतून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना पदे देऊ नका, पवारांच्या त्यागाची किंमत त्यांना समजलीच पाहिजे”

‘…नाहीतर कोरोना पुन्हा येईल’; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा इशारा

येत्या काळात भाजप ‘आरक्षण’ बाजूला काढेल- जितेंद्र आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या