महाराष्ट्र मुंबई

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु- उद्धव ठाकरे

Loading...

मुंबई | हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच ठेऊ. कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

जीवनावश्यक कामे सुरुच राहतील. भाजीपाला बंद होणार नाही, भाजी आणण्यासाठी एकट्यानेच जा, अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

Loading...

हॉस्पिटल, वेंटीलेटर, मास्कची सुविधा अनेक जन उपलब्ध करून देत आहेत, जीवनावश्यक वस्तू, शेती माल वाहतूक थांबवलेली नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

दरम्यान, ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वत:हून पुढे येत आहे. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना विनंती आहे की हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

पोलीस दिसताच पत्नीला सोडून पुण्यातील पतीनं काढला पळ!

महत्वाच्या बातम्या-

लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होवो; राज ठाकरेंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनता त्यांचं का ऐकेल?”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या