महाराष्ट्र मुंबई

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्ग रोखण्यात यश- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि कोविडसंदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली. यावेळी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दिवाळीनंतर पुढचे 15 दिवस जागरुकतेचे आहे. त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचं पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

कोरोना संसर्ग रोखण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबवण्याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्यात.

हे वर्ल्ड वॉर आहे असं मी मार्च महिन्यात म्हणालो होतो, इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू  मिळवण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“वेब सीरिजच्या नावाखाली चौकट मोडू नका, अन्यथा…”

चंद्रकांत पाटलांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु करा- उद्धव ठाकरे

“बाहेर येताच अर्णब 100 टक्के भाजपचा विरोध करणार”

“अनेकजण आमदारकीसाठी इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या