मुंबई | काहीजण विचारतात की त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे रुग्णसंख्या जास्त कशी तर यावर उत्तर हेच आहे की जे खरं आहे ते आम्ही दाखवतोय. सुरुवातीचे आकडे जसे खरे होते तसे आजचे आकडेही खरेच आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
कोरोनाच्या या कठीण प्रसंगातून कोणतंही राज्य, देश सुटलेला नाही. याचा सर्वांच्या अर्थव्यवस्थांना फटका बसला. पण अशा परिस्थितीतही आपण करोनाची रुग्णसंख्या किंवा रुग्णांच्या मृत्यूंची संख्या यामध्ये कुठेही लपंडावाचा खेळ केलेला नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.
जनतेचे आभार मानावेत ते थोडेचं आहेत. कारण सरकार जे जे सांगतं आहे ते जनता ऐकत आहे. म्हणूनच अद्याप आपण या संकटावर मात केलेली नसली तरी लवकरात लवकर मात केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
चिंताजनक! कोरोना रूग्णांमध्ये आढळली 2 नवी लक्षणं
तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय- उद्धव ठाकरे
कोरोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार
रेखा जरे हत्येप्रकरणी पोलिसांचा धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानंच दिली सुपारी!
2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढणं; देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका