बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…नाहीतर मीच पहिली लस घेतली असती- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्लाय केलं.

कुणाला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

केंद्र सरकारने लस देण्यासाठी कुणाला प्राधान्य द्यायचं याच्या सूचना दिल्या आहेत. कोविड योद्धांना लस देण्यासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी केल्या आहेत. नाही तर मीच पहिली लस घेतली असती, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आज आपण क्रांतिकारी पाऊल टाकलं आहे. मात्र अजूनही संकट टळलेलं नाही. लस घेतली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. अजूनही हजारो लोकांना लस द्यायची बाकी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तर सावधान; तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात!

“कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ औवेसी”

प्रसिद्ध अभिनेत्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप

“पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More