Top News

सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- उद्धव ठाकरे

मुंबई | सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आपण सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडली आहेत. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकीची वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा, असं आवाहन उद्धव ठाकरेेंनी केलं आहे.

कोरोनाचं संकट टळलेलं नाही, तरुणांनो सावध राहा. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावं लागणार आहे. एकदा डोस दिला, तर पुन्हा बुस्टर डोस द्यावे लागणार आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.

सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही, पण सावध राहा यानंतर येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता- छगन भुजबळ

“पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार

‘तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’; राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना फोन

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’; कपिल सिब्बलांचा काँग्रेसला पुन्हा एकदा घरचा आहेर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या