महाराष्ट्र मुंबई

“धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलणार”

मुंबई | धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे या विषयाची कोंडी फोडण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न केले जातील. आरक्षणाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी विचारविनिमय करून सल्ला घेतला जाईल. तसेच या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व्हावा यासाठी समन्वयही साधला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही- रोहित पवार

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत- चंद्रकांत पाटील

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी दुसऱ्यांदा मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची नियुक्ती

मोदी सरकारच्या काळात देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चाललीये- सुशीलकुमार शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या