महाराष्ट्र मुंबई

…म्हणून मी स्वतः ड्रायव्हिंग करतो- उद्धव ठाकरे

मुंबई | माझे सरकारी चालक आहेत त्यांना पण किती दडपून ठेवायचं, किती बंधनं ठेवायची. मग प्रत्येकवेळी त्यांची कोरोना टेस्ट करा. तर हा त्रास नको म्हणून मी ती सुरुवात केली आणि आता ड्रायव्हिंग सुरूच आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दैनिक ‘सामना’साठी मुलाखत दिली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

मी गाडी चालवतच राहीन. ठीक आहे, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी परत गाडीत नुसता बसून प्रवास करेन. मुख्यमंत्रिपद त्याची प्रभावळ काही जण मानतात, पण तसं काही नाहीच. मुख्यमंत्रीसुद्धा माणूसच असतो. पंतप्रधानही माणूसच असतो. फक्त आपल्यातली माणुसकी कुणी घालवू नये, जाऊ देऊ नये, हे ज्याने त्याने पाहायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

ज्या दिवशी मुख्यमंत्र्यातली, पंतप्रधानातली माणुसकी मरेल त्या दिवशी तो पंतप्रधान किंवा तो मुख्यमंत्री कामाचा नाही. जमिनीवर आहेत, क्लचवर आहेत, ब्रेकवर आहेत आणि एक्सिलेटरवरही आहेत आणि हातात स्टेअरिंगपण आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या- 

तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू-उद्धव ठाकरे 

भारतीयनौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं” 

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’; शहीद जवान यश देशमुख यांच्या अखेरच्या संवादाने पाणावले डोळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या