उस्मानाबाद महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला, म्हणाले…

उस्मानाबाद | एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे.

यशाची शिखरं पार करत असताना पायाची दगडं का निसटत आहेत, याचा विचार भाजपनं करावा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भाजपची पाळंमुळं रोवली आहेत. त्यामुळे खडसेंसारखा नेता पक्ष का सोडतो, पक्षाची पाळंमुळं रोवणारी माणसे का सोडून जात आहेत? याचा विचार भाजपने केला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

नवीन अंकूर फुटताना मूळंच का उखडली जाताहेत, याचाही त्यांनी विचार करावा. आम्ही एकेकाळी त्यांचे मित्र होतो. त्यामुळे त्यांना हा माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण इतकं खुनशी असेल वाटलं नव्हतं”

कोण आहे ‘तो’ भाजपचा नेता, फक्त त्यानंच एकनाथ खडसेंना फोन केला!

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भाजप सोडताना एकनाथ खडसे आक्रमक; देवेंद्र फडणवीसांवर केले ‘हे’ धक्कादायक आरोप

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या