मुंबई | राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार स्थापन झालं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच सविस्तर त्यांची भूमिका मांडली आहे. यावेळी नक्की चुकलं कुठं?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.
चूक माझी आहे ते मी माझ्या फेसबूक लाईव्हमध्ये पहिल्यांदाच सांगितलं आहे. मी कबूल केलं आहे गुन्हा माझा आहे. तो म्हणजे मी यांना परिवारातला समजून मी यांच्यावरती अंधविश्वास ठेवला, असं ते म्हणालेत.
महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? त्यावर ठाकरेंनी उत्तर दिलं की, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. तसं झालं नाही. जनता आनंद होती. कारण सत्तेत आल्या आल्या आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त केलं होतं. त्याच्यानंतर मी अभिमानाने सांगेन, कोरोना काळात संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केलं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना भवन कुणाचं? अशी चर्चाही राज्याच्या राजकारणात सुरु आहे. यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. शिवसेना कायम ठाकरेंचीच आहे. त्यासाठी आम्हाला पुरावे देण्याची गरज नाही. जनता निवडणुकीची वाट पाहत आहे. जनताच आमचे पुरावे देईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”
काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर
‘एकनाथ शिंदेंची भूक अजून भागली नाही का?’; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
‘जन्म दिला त्याच आईला गिळायला निघालेली ही अवलाद’; उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं
जितेंद्र आव्हाडांची बाबासाहेब पुरंदरेंवर टीका, म्हणाले…
Comments are closed.