उस्मानाबाद | शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून उद्या गुरुवारी आर्थिक मदत जाहीर होणार आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काटगाव येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मी आढावा घेतला आहे. मी इथे केवळ आकडे सांगायला आलो नाही. केवळ तुम्हाला बरे वाटावं म्हणून आकड्यांची फेकाफेक करणार नाही. आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तोपर्यंत 80 ते 90 टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं समाधान होईल अशी मदत तुम्हाला केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
तुमच्या सुखा समाधानासाठी जे जे करता येईल, ते मी करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मी जे बोलतो ते करतो. जे बोलत नाही. ते करत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय पोलिसांच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान- अजित पवार
…तर आम्ही भाजप नेत्यांचं अभिनंदन करू- बाळासाहेब थोरात
खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर!