उस्मानाबाद | पंचनाम्यांचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झालं आहे. यानंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आम्ही मदतीसंदर्भात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी काटेवाडी गावातील शेतकऱ्यांंशी संवाद साधला.
मी यापूर्वी तुम्हाला भेटायला आलो होतो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. आपली ओळख जुनी आहे. मध्यंतरीच्या काळात माझ्यावर अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी येऊन पडली. यामध्ये माझं कर्तृत्व शून्य आहे, केवळ तुमच्याचा आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकार शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करुन त्यांचे आयुष्य पुन्हा उभे करेल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
भारतीय पोलिसांच्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आम्हाला अभिमान- अजित पवार
…तर आम्ही भाजप नेत्यांचं अभिनंदन करू- बाळासाहेब थोरात
खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, म्हणाल्या…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर!
आयपीएलच्या सामन्यात मराठी समालोचनाचा पर्याय द्या, अन्यथा…; मनसेचा हॉटस्टारला इशारा