बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं- उद्धव ठाकरे

मुंबई | शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. तसेच यामुळे राजकीय वातावरण शोकाकुल झाल्याचं पाहायला मिळत आहे. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सोलापुरात अखेरचा श्वास घेतला. गणपतराव देशमुख यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.

राजकारणातील एक साधं आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपलं, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील. गणपराव यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलं ते मला जास्त महत्वाचं वाटतं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. परंतु शुक्रवारी अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचं निधन झालं आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील राजकारणातील एक मोठा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

थोडक्यात बातम्या-

“पंकजा मुंडेंचा भाजपत छळ होत असल्याने मीच त्यांना पहिली ऑफर दिली”

“अभ्यास नंतर करा आधी पूरग्रस्तांना तातडीची मदत करा”

…म्हणून आम्ही पहिल्या दिवशी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं- शर्मिला ठाकरे

राजकारणातील एका सत्वशील पर्वाचा अस्त; ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख काळाच्या पडद्याआड!

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारतेय; पाहा आजचे सकारात्मक आकडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More