महाराष्ट्र मुंबई

आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवा, नवी नांदी निर्माण करा- उद्धव ठाकरे

औरंगाबाद | आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवण्यासाठी आणि नवी नांदी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूयात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्यात तीन पक्ष मिळून पहिल्यांदाच एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही निवडणूक एक दिलाने आणि मोठ्या जोमाने लढवूया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मला निवडणुकीचा कसलाही अनुभव नाही तरी सुद्धा मी मुख्यमंत्री झालो आहे. अशा अनुभवी मुख्यमंत्र्याला तुम्ही साथ देत आहात, असं सांगत उद्धव ठाकरेंनी जनतेचे आभार मानले.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मतदार निवडून देतील. या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की मन लावून काम करा. शिवसैनिक जोमाने काम करतील आणि आपला विजय होईल, अशी मला खात्री आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला…

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार- देवेंद्र फडणवीस

…अन् नागरिकांनी नगरसेवकाला चक्क गटाराच्या पाण्यात बसवलं!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, पुणेकरांनो काळजी घ्या- अजित पवार

‘सरकारची भूमिका लोकविरोधी आहे’; देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या