नाशिक | गुजरातचे पाणी आणि महाराष्ट्राचे पाणी हा विषय आता राहिलेलाच नाही. जे पाणी आपलं आहे ते आपलंच आहे. ते गुजरातला न जाता आपल्याकडे कसं आणायचं यावर काम सुरू करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
नाशिक विभागातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या ठाकरे यांनी सायंकाळी नाशिक जिल्ह्याची बैठक घेतली. बैठकीला उपस्थित आमदारांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपलं पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रातले बरेचसं पाणी गुजरातला वाहून जात असून आपल्या राज्यात मात्र अनेकदा पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याकडे आमदारांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं.
दरम्यान, गुजरातचे पाणी आणि महाराष्ट्राचे पाणी हा वादच आता राहिलेला नाही. आपल्या राज्याचं पाणी हे राज्यातील जनतेच्याच हक्काचं असून ते पाणी गुजरातला तसेच समूद्रात वाहून जाऊ नये, यासाठी काय करायला हवं यावर काम करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कलह पसरवणाऱ्यांना समाजच सरळ करेल- मोहन भागवत
3500 मराठा उमेदवारांना तात्काळ नियुक्ती दया नाहीतर…- प्रवीण दरेकर
महत्वाच्या बातम्या-
अजित पवारांना झाली ‘त्या’ शपथविधीची आठवण; म्हणाले…
बाबरी मशिदीबाबतच्या माझ्या मुलाच्या ‘त्या’ वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी
बाबो! कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो तब्बल इतकं मानधन!
Comments are closed.