मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून आरोपीला फासावर लटकवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल. या खटल्याचा पाठपुरावा करून तो लवकरात लवकर निकाली काढू. अनेकदा खटला लांब चालतो. निकाल लागल्यानंतरही अंमलबजावणीसाठी वेळ लागतो. मी तसं होऊ देणार नाही, लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून आरोपीला फासावर लटकवू, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे आंध्र प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात कडक कायदा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसंच महाराष्ट्रात असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची काळजी सरकार घेईन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी
या सदस्याच्या निधनानं ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’वर शोककळा
महत्वाच्या बातम्या-
शाहीन बागेतील आंदोलक कायमस्वरूपी रस्ता अडवून धरू शकत नाही- सर्वोच्च न्यायालय
“हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायी”
पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरच संतप्त गावकऱ्यांची दगडफेक
Comments are closed.