मुंबई | कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या ‘संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
कोर्टात एखादं प्रकरण असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायाचे नसतात. कारण तो कोर्टाचा अवमान समजला जातो. पण कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचं नामांतर केलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता हा वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे. कोर्टात ही मागणी करायला हवी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
कर्तृत्वाला मिळाली नशिबाची साथ; सर्वात कमी वयाचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा!
आशिष शेलार भाजप आणि संघाचे गुलाम- अमोल मिटकरी
“शरद पवार, संजय राऊत तुमची तोंडं आज का शिवली आहेत?”
आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीचा प्रचार, पाटील आता काँग्रेसमध्ये दाखल!
भारतातील ‘या’ शहरात पेट्रोलचे दर शंभर रुपयांच्या पार
Comments are closed.