बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हाही काळ निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल- उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मागच्यावेळी सुद्दा लॉकडाऊनच होता. यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नाही. हे आपल्यामागे काय लागलंय कळत नाही. सध्याचा जो काळ आहे हा निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं

आजच आपण ज्या पद्धतीने संयम दाखवत आहोत, तो जर दाखवला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं. अजूनही आपल्याला बंधनं पाळणं गरजेचं आहे. मगील वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्यावेळी आपल्या महाराष्ट्रात फक्त दोन लॅब होत्या. आज 29 एप्रिल 2021 ला सध्या राज्याता 609 प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

तिसरी लाट येणार असं तज्ञ सांगत आहेत. तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही. त्यासाठी सरकारनं कंबर कसली आहे. उद्योजकांना तिसऱ्या लाटेची तयारी करायला सांगितली आहे. काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना व्हायरसची तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजन कमी पडणार नाही- उद्धव ठाकरे

राज्याला रोज 50 हजार इंजेक्शनची गरज मात्र केंद्राकडून फक्त…- उद्धव ठाकरे

लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही- उद्धव ठाकरे

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांचे निधन, नुकतेच कुंभमेळ्यावरुन परतले होते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More