Top News आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

पुन्हा लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Photo Credit- Uddhav Thackeray Twitter

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते.

लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक आणि आवश्यक कारवाई केलीच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे, त्यात जणू काही कोरोना संपला असे सगळे वागत आहेत, परिणामतः आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना आपण धोक्यात आणतो आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“हिंमत असेल तर पाकिस्तान बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा”

“एखाद्या हत्येची आत्महत्या करण्यात हे सरकार माहीर आहे”

भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल- उद्धव ठाकरे

लग्नाआधीच्या प्रेयसीसोबतची ऑडिओ क्लीप पत्नीने ऐकली अन् मग….

या लोकांना महिलांवर अत्याचार करायला सरकारने लायसन्स दिलंय काय?- नारायण राणे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या