बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षामध्ये लढा देणाऱ्या, रक्त सांडणाऱ्यांना मानाचा मुजरा- उद्धव ठाकरे

मुंबई | संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षामध्ये लढा देणाऱ्या, रक्त सांडणाऱ्यांना मानाचा मुजरा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवली आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक वर्षांची आहे. बलिदान दिल्यानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळाली, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचं आधी ठरवलं होतं, पण आता नाईलाज आहे, आजही मी तोंडावर मास्क लावून अभिवादन केलं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोनाविरोधात महाराष्ट्र लढतोय, महाराष्ट्राची जनता मोठी साथ देत आहे, कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लॉकडाऊनचा उपयोग झाला, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

“देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल”

पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!

महत्वाच्या बातम्या-

हो, मी पुरावे बघितलेत, वुहानच्या लॅबमधूनच कोरोनाची उत्पत्ती- डोनाल्ड ट्रम्प

“आता मुखपत्रातून नव्या जोमाने पंतप्रधानांचा शेलक्या भाषेत उल्लेख सुरु करा”

संजय राऊतांनी मानले निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारचे आभार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More