महाराष्ट्र मुंबई

तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय- उद्धव ठाकरे

मुंबई | राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरी आमचा कारभार उत्तम चाललाय. तिन्ही पक्षांमध्ये आडमुठेपणा नाही. तसेच राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं यावर अजूनही विश्वास बसत नाही. दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले. पण आमचं सरकार उत्तम चाललं आहे. जनतेचा आशीर्वाद आहे. तिन्ही पक्षात आडमुठेपणा नाही. त्यामुळे राज्यावर राजकीय संकट येणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

तीन चाकांचं सरकार अशी आमच्यावर टीका करण्यात आली. पण हे सरकार केवळ तीन चाकांचं नाही. या सरकारला चौथं चाकही आहे. हे चौथं चाक जनतेच्या विश्वासाचं आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे. जनता जनार्दनाचा रथ आहे. तो पुढेच धावेल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनावर मुख्यमंत्र्यांचा एवढा अभ्यास झाला की ते अर्धे डॉक्टर झालेत- अजित पवार

रेखा जरे हत्येप्रकरणी पोलिसांचा धक्कादायक खुलासा; ज्येष्ठ पत्रकारानंच दिली सुपारी

2 दिवसांचं अधिवेशन म्हणजे चर्चेपासून पळ काढणं; देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

प्रियकरानं गुपचूप लग्न उरकल्यानं प्रेयसी संतापली; रागाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या