महाराष्ट्र मुंबई

“रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही”

मुंबई | रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. ते विधानसभेत बोलत होते.

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेलं नाही. ही लढाई लढत असताना मध्येच कुणी टुमणं काढलं इतर समाजाचं आरक्षण काढणार का, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. पण मी सभागृहात ग्वाही देतो, मराठा आरक्षण देताना अन्य कुणाचं आरक्षण काढणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावं लागेल. मी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने बोलतोय, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. तसेच
विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काहीही करू शकणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवीन विषाणू

नरेंद्र मोदींनी आधुनिक स्टॅलिन होऊ नये- राजू शेट्टी

“कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन रद्द करणाऱ्या मोदींना कितवं आश्चर्य म्हणणार?”

हृतिक, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील- कंगणा राणावत

“फुटकळ चर्चेसाठी सरकारकडे वेळ आहे, पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या