नागपूर | एकीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेला दारं खुली असल्याचं सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी भाजप आमदारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाहून भाजप आमदारांना आमंत्रणासाठी फोन करण्यात आल्यानंतर भाजप आमदार येणार की त्यावरही बहिष्कार घालणार याविषयी चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता भाजप आमदार स्नेहभोजनला उपस्थित राहणार असल्याने नव्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
सायंकाळी 7:30 वाजता ‘रामगिरी’वर मुख्यमंत्र्यानी स्नेहभोजनाचं आयोजन केलं. त्यात महाविकासआघाडीच्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे.
शिवसेनेकडून फोन आल्यामुळे भाजप नेत्यांना आणि आमदारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे जुन्या मित्राने दिलेल्या आमंत्रणाला भाजप स्वीकारणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“मुस्लिमांनी घाबरु नये, नागरिकत्व कायद्याचा आपल्याशी संबंध नाही”- https://t.co/MZtsN1jSM7 #म
— थोडक्यात (@thodkyaat) December 18, 2019
सभागृहात भाजप आमदाराचा गोंधळ घातला अन् धनंजय मुंडे म्हणाले, अहो दाजी आपण जरा शांत बसा! – https://t.co/4UJuXiYVxp @dhananjay_munde @NCPspeaks @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) December 18, 2019
मला रामदास आठवलेंच्या रिपाइंमध्ये प्रवेश करायचंय- एकनाथ खडसे https://t.co/YxWYakDDCH @EknathKhadseBJP @BJP4Maharashtra @RamdasAthawale
— थोडक्यात (@thodkyaat) December 18, 2019
Comments are closed.