महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंकडून फडणवीस सरकारचं कौतुक, म्हणाले…

File Photo

मुंबई | येत्या दोन चार वर्षांत मुंबई बदलणार आहे. मुंबईचे रुपडे पालटणार आहे. मागच्या सरकारने ज्या वेगाने काम केलं त्या पेक्षा अधिक वेगाने काम करत नागरिकांच्या सेवेस उतरू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. हा कार्यक्रम चारकोप येथील डेपोमध्ये संपन्न झाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या कामांची स्तुती केली.

यापूर्वीच्या सरकारने चांगलं काम केलं नाही, असं म्हणणारा मी नतभ्रष्ट नक्कीच नाही. पूर्वीच्या सरकारने जे काम केलं ते नाकारण्याचा नतभ्रष्टपणा मी करणार नाही. पण पूर्वीच्या सरकारपेक्षा अधिक गतीने मी ते काम पूर्ण करतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विकास कामं कोव्हिड काळात जरुर मंदावली. कारण तो काळ भीषण होता. त्या काळात सुद्धा काम सुरुच राहिलं. मेट्रोचं रुपडं फार आकर्षक आहे. आताच्या घडीला जे जे आवश्यक आहे ते सगळं सरकार करत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! दिल्लीच्या व्हीव्हीआयपी परिसरात स्फोट

आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, तुम्ही एक इंचही मागे हटू नका- राहुल गांधी

“सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय काकांमुळे लागली”

सगळ्यांनीच अयोध्येला गेलं पाहिजे, मी देखील जाणार आहे- देवेंद्र फडणवीस

“मनसेने आतापर्यंत कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे राज ठाकरेंनाही सांगता येणार नाही”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या