महाराष्ट्र मुंबई

“मुंबईतील नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्या”

मुंबई | पावसाळ्यात पाणी साचू नये याकरिता नाल्यांच्या सफाईसोबतच त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

मुंबई शहरात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महानगरातील मंडया, उद्याने, रस्ते यांच्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

मुंबईतील पादचारी मार्ग, उड्डाणपूल, वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करणं, शौचालयांची संख्या वाढवणं, फूड हब तयार करणे, बस थांब्यांचे नूतनीकरण ही कामे जून अखेरपर्यंत पूर्ण करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘सॉरी पप्पा, मला जगण्याचा अधिकार नाही’; फेसबुक पोस्ट करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

खासदारांना आता जेवणाचे पूर्ण पैसे भरावे लागणार; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

”जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ”

‘मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, त्यामुळे…’; अण्णा हजारेंचं मोदींना पत्र

“राज्यात महाविकासआघाडीच्या तुलनेत भाजप 20 टक्के देखील नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या