महाराष्ट्र मुंबई

नाईट कर्फ्यूवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलं आहे.

दोन दिवसांपासून संचारबंदी सुरु असून अनेकजण कोरोना रात्री मोकाट फिरतो आणि दिवसा घऱात बसतो का? अशी विचारणा करत आहेत. तसं नाहीये….जनतेला थोडीशी जाणीव करुन द्यायची गरज असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दिवसा आपण लॉकडाउन करु शकत नाही. तशी वेळही येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. अनावश्यक गर्दी टाळणं हे जास्त महत्वाचं आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी रात्रीपासून 5 जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू राहील.

थोडक्यात बातम्या-

राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये खळबळ

शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत- राहुल गांधी

“राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार”

कोणताही कायदा मराठा आरक्षण देऊ शकणार नाही- आनंद दवे

“राजू शेट्टी आता शेतकरी नेते राहिले नाहीत, त्यांच्यात हे सत्य स्वीकारण्याचं धाडस नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या