“खुर्च्या येतात, जातात पण मला लोकांच्या हृदयात स्थान हवंय”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाईंदर पश्चिमेस विकासक प्रकाश जैन (Prakash Jain) यांनी उभारलेल्या वालचंद हाईट्स संकुलातील नव्याने बांधलेल्या भगवान विमलनाथ जैन मंदिराचे जीर्णोद्धार आणि अंजन शलाका प्रतिष्ठा महोत्सव साठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आले होते. यावेळी जैन मुनी आचार्य भगवंत यशोवर्म सुरीश्वरजी महाराज यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले

जैन मुनी यांनी प्रवचनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा एक किस्सा सांगितला. 14 एप्रिल 1991 रोजी दादर येथे लब्दी सुरी जैन ज्ञान मंदिर येथे बाळासाहेब यांनी स्वतःहुन जैन महाराजांच्या तेज आणि ज्ञानाला प्रभावित होऊन जीवनात काहीतरी त्याग करायचा म्हणून त्यांनी मासांहारचा त्याग केला होता याची आठवण करून दिली आहे.

आपल्या कडे गुरुला विसरणारे , गुरु व वडील चोरणारी लोकं निर्माण झाली आहेत. पण संस्कार चोरता येत नाही ते जन्मजात असतात. चांगले संस्कार येण्यासाठी व जपण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद हवे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंनी टोला लगावला.

दरम्यान, जैन मुनींच्या प्रवचनातील बाळासाहेबांचा संदर्भ घेत उद्धव ठाकरेंनी आजही देशात बाळासाहेबांची कायम आहे, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-