बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज-उद्धव एकत्र येतील का?; उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई | लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र येणार का?, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं होतं. तोच प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

देशासाठी, राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं, सध्या देशात जे संकट आहे ते साधंसुधं नाही, या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊन किती काळ चालवायचा माहिती नाही, माझी प्राथमिकता जीव वाचवण्याला आहे, घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ? माझं म्हणणं आहे जे जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं, राजकारण थांबवावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मी जबाबदारी घेतली, मी माझ्यासाठी काही करत नाही, मला मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा नव्हती. खुर्ची हे वैभव आहे, देवाची दया आहे, अनेकांचं स्वप्न या खुर्चीचं होतं. त्यामुळे माझी खुर्ची खेचाल, तुम्ही बसा. पण खुर्चीचा मुद्दा काय आहे तर काम करा, माझ्यापेक्षा दुसरा काम करत असेल तर बरं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“अशोक चव्हाणांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”

नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांची नरेंद्र मोदींवर टीका, म्हणाले…

ह्रदयद्रावक! कोरोनाची लागण झालेल्या नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राष्ट्रवादीच्या आमदारानं उडवली संजय राऊतांची खिल्ली, म्हणाले मी तर आता घाबरलो!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More