बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही”

मुंबई | उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) शरद पवारांवर एवढं प्रेम का हेच तर मला कळत नाही. कोडं उलगडत नाही. रात्री दोन दोन वाजता उठून बसतोय. झोप लागत नाही. जेवण जात नाही. तेच माझंही दुख आहे, असं माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केला आहे.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.

शरद पवार यांनी शेवटी डाव साधला. उद्धव ठाकरे हे भोळे आहे. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना कळला नाही. आमचा पक्ष हा शरद पवारांनी फोडला आहे. शरद पवार यांनी शिवसेनेचे लोक फोडले. हे सातत्याने होत आहे. प्रत्येक आमदार उद्धव ठाकरे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याच शरद पवार यांच्यावरील प्रेम कमी होत नाही. आज एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचललं नसतं तर शरद पवार आणि अजित पवार यांनी पक्ष संपवला असता, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तरीही पवारांनी कुणबी लोकांना फोडलं आणि राष्ट्रवादीत घेतलं. मी उद्धव ठाकरेंना फोटो पाठवले. अजितदादा चेक देतानाचे फोटो दिले. जयंत पाटील सभा घेतानाचे फोटो दिले. मी सातत्याने हे साांगितलं. आमदारांनीही सांगितलं. पण त्याकडे लक्षच दिलं नाही, असं रामदास कदम म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वरुण सरदेसाईंना मोठा धक्का!

“…तरी देखील आदित्य ठाकरेंना मला साहेब बोलावं लागतं”, अन् रामदास कदमांना रडू कोसळलं!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर

’50 वर्षात उभं केलेलं पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं’; रामदास कदम ढसाढसा रडले

‘आता प्रवाहासोबत जावं लागणार’, आणखी एका नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More