बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जर कोणी धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी…- उद्धव ठाकरे

मुंबई | प्रत्येकाला धर्म आहे. पण माणूस आधी माणूस म्हणून जन्माला येतो. त्यानंतर जात-पात धर्म त्याला चिपकवली जातात. मग काय करायचं? नास्तिकच व्हायचं का? नाही, अजिबात नाही. तुम्ही धर्म जरुर पाळा. धर्माचं पालन जरुर करा. पण तो सर्व अभिमान आपापल्या घरात ठेवा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई वाचक प्रेरणा दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ लेखक प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांचा संग्रहाचं प्रकाशन झालं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

घराबाहेर पडताना हा देश माझाच धर्म हीच धारणा असली पाहिजे. ही भावना घेऊन घराबाहेर पडल्यानंतर कुणी त्याच्या धर्माची मस्ती होऊन माझ्यासोबत उभा राहिला तर मग मला एक कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय पर्याय नाही. मी कडवट हिंदू म्हणून उभा राहीन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे. ते बोलताना हेही मी सांगितलंय, हे जे शब्दांचे धन आहे, प्रबो’धन’ ते माझ्याही पेटाऱ्यात आहे. पण काही वेळेला बोलण्याचं धाडस, कारण लोकशाहीत मत लागतं, त्यासोबत धाडसही लागतं. मत नाही मिळालं तरी चालेल, पण हिंमत पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

आरोग्यमंत्री रूग्णालयात फोटोग्राफर घेऊन आले अन् मनमोहन सिंग यांची मुलगी संतापली

‘सरकारी नोकऱ्याच नाहीत तर आरक्षण कुठून देणार?’; नितीन गडकरींचं रोखठोक मत

“मुख्यमंत्रीपद गेल्यावर दोन माणसंही भेटायला येत नाहीत”

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More