मुंबई | भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्त्व करेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि काही आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
रामाच्या नावानं काही लोक घरोघरी पोहोचत आहेत, पण ते पैसे मागण्यासाठी पोहोचत आहेत, आपल्याला तसं करायचं नाहीये, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर होती, आता भाजप पैसे गोळ्या करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
या लोकांना महिलांवर अत्याचार करायला सरकारने लायसन्स दिलंय काय?- नारायण राणे
“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे आता जोडीने मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहत बसतील”
‘…पण भाड्याचं घर शेवटी भाड्याचं असतं’; कंगणा राणावतचा ट्विटरला टोला
‘भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला माहित’; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट
जेव्हा नाचायला लागली शालू… सोशल मीडियावर पोरं झाली चालू, पाहा व्हिडीओ