महाराष्ट्र मुंबई

“छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान”

मुंबई | छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ते शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलत होते.

केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून पोलिसांना बदनाम केलं जात आहे. मुंबई पाकव्यापत काश्मीर झालं, असं बोलणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान आहे. ते पंतप्रधानांचं अपयश आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र पुढे जातो, म्हणून अनेकांचा पोट दुखतं आहे. चरस गांजा उघड विकला जातो, असे चित्र उभं केलं जातं आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराबाहेर तुळशी वृंदावन आहे. तुमच्याकडे गांजाची वृंदावने आहेत का?, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

मुंबई पाकव्याप्त काश्मीर झालं आहे. पाकव्याप्त काश्मीर सोडा, पण अधिकृत काश्मीरमध्ये एक तरी इंच जमीन घेऊन दाखवा, मुंबईचं मीठ खायचं आणि नमक हरामी करायची, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- उद्धव ठाकरे

“उद्धव ठाकरे आज दोन भूमिकांमध्ये, त्यामुळे भाषणासाठी कान आतूरलेले

कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस…- अमृता फडणवीस

“आपल्याला मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचं आहे”

…तर माझी अवस्था देखील आडवाणी आणि वाजयपेयींसारखी झाली असती- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या