महाराष्ट्र मुंबई

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील- उद्धव ठाकरे

मुंबई | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने धडाकेबाज विजय मिळवला आहे. यानंतर सर्वच स्तरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टीम इंडियाच्या या विजयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द यांच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘टीम इंडिया’च्या विजयावर शरद पवारांचं ट्विट, म्हणाले…

‘घ्या निवडणुका, महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर…’; भाजपचं शिवसेनेला ओपन चॅलेंज

पाकिस्तानला हवी भारतीय लस; पुण्यातील सीरमच्या लसीसाठी प्रयत्न सुरु!

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया- शरद पवार

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या